विनायक कोथळकर

मुखवट्याच्या मागे नजरेच्या आड (कथा संग्रह)

हे पुस्तक म्हणजे माणुसकीच्या अदृश्य जगाचा प्रवास आहे. ‘मुखवट्याच्या मागे नजरेच्या आड’ आपल्याला अशा कथांमध्ये घेऊन जाते जिथे बाह्य जगात दिसणारे आनंद आणि समाधान हे आत दडलेल्या दुःख आणि भीतीचा केवळ एक पडदा असतो.
जिथे वात्सल्य कधी काळजीत बदलते आणि प्रेम कोणत्यातरी अज्ञात प्रयत्नांचे फळ असते.
समाजात रूढ असलेल्या गोष्टींच्या पलीकडे असलेले अविश्वसनीय सत्य जे अनेकदा आपल्या नजरेच्या टप्प्याबाहेर राहते. आशा-अपेक्षा, मातृत्व, भीती आणि जगण्याची धडपड यांसारख्या भावनांचे कच्चे आणि खरे रूप.
प्रत्येक कथा तुम्हाला सखोल विचारात पाडेल. ती संपल्यानंतर तुमच्या मनात हमखास एक प्रश्न उभा राहील…
“खरंच, असं असू शकते या विश्वात?”
तुमचा मुखवटा बाजूला ठेवा, सत्य स्वीकारा आणि या प्रवासात सामील व्हा. कारण, नजरेच्या आड दडलेले सत्य नेहमीच सर्वात धक्कादायक असते.
तुम्ही कधी तुमचा चेहरा आरशात निरखून पाहिला आहे का?
त्या हसऱ्या, शांत किंवा यशस्वी चेहऱ्यामागे कोणती भीती, कोणती काळजी किंवा कोणते अपूर्ण प्रेम लपलेले आहे? ‘मुखवट्याच्या मागे नजरेच्या आड’ हे तुमच्या अंतरंगात डोकावणारे पुस्तक आहे.
तुम्ही स्वतःला विचाराल: मी माझ्या आयुष्यात कोणता मुखवटा घातला आहे?
हे पुस्तक म्हणजे केवळ एक वाचन अनुभव नाही, तर स्वतःला पुन्हा ओळखण्याची एक वैयक्तिक संधी आहे.

शौर्यचीगाथा (कादंबरी)

ही कथा केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यातील प्रवासाची कहाणी नाही, तर ती प्रत्येक वाचकाच्या मनाला आणि हृदयाला स्पर्श करणारी एक प्रेरणादायी अनुभूती आहे. जरी कथा पूर्णपणे काल्पनिक असली तरी तिच्यातील भावना, प्रसंग आणि पात्र इतकी खरी वाटतात की, ती वास्तव्याच्या खूप जवळ जाणारी ठरते.
ही कथा एका अशा प्रवासाची आहे, जिथे आत्मशोध, संघर्ष, प्रेम, विश्वास आणि यश यांचे विविध पदर उलगडत जातात. पात्रे जरी काल्पनिक असली तरी त्यांचे अनुभव, त्यांचे निर्णय आणि त्यांची मनस्थिती ही तुमच्या मनारी आणि जीवनाशी इतकी जोडली जाते की, तुम्हाला ते तुमच्या आयुष्यातीलच काही अंश वाटू लागतात.
अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद आणि ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी मिळणारं बळ, प्रेरणा आणि आत्मविश्वास या कथेचा गाभा आहे.
जीवनात येणारे प्रेम आणि त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास, हे कथानकातला एक हळवा पैलू आहे.
कथेत काही प्रसंग इतके थरारक आणि अनपेक्षित आहेत की, वाचकांना पुढे काय होणार याची तीव्र उत्सुकता वाटते.
पण वाचकांना डोळे उघडे ठेवा आणि एकाग्रतेने संपूर्ण कथा अनुभवा. कथा वाचून झाल्यावर तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा विचार करा. या कथेत आत्मविश्वास आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, मैत्री आहे, आनंद आहे, ध्येय आहे आणि भविष्याची काळजी सुद्धा आहे.

सेवा

चित्रपट, मालिका, जाहिरातींसाठी कथा आणि स्वतंत्र संगीतासाठी भावपूर्ण आणि धुनीशी सुसंगत मराठी गीतलेखन. कथा, कादंबरी, पटकथा व निबंध लेखनासाठी संकल्पना विकास, संरचना आणि संपादनाची व्यावसायिक सेवा.

“विनायक कोथळकरांच्या प्रत्येक कादंबरीतील शैली, प्रकार आणि भाषा इतकी स्पष्ट असते की वाचक त्वरित गुंततो.”