विनायक कोथळकर

मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणारे प्रमुख आणि प्रसिद्ध लेखक

विष्णू वामन शिरवाडकर अर्थात ‘कुसुमाग्रज’

“शब्द नव्हेच तर, भावना आहे
ती मनाच्या शांतीची
अन्यायाविरोधातल्या क्रांतीची
क्रांतीच्या तेजात उमललेल्या समरसतेची” “धुळीमधुनी फुलतील ज्वाला धगधगती पाषाणमरणाला घाबरत नाही, मी कणा आहे, वाकणार नाही!”


“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अमुच्या आशा,किनारा तुला पामराला!”
“हसणे आणि रडणे यातच आयुष्य संपते,पण दुसऱ्याच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यात खरा आनंद असतो.”

गजानन दिगंबर माडगूळकर

“स्वर्ग तीन अक्षरांचा, सहवास तुझ्या पायीं।”
“शकले जरी तुकडे झाले तरी चंद्र एकच राहील, प्रेमाचा प्रकाश मात्र कधीही नाही ममेल।”
“नाच रे मोरा आंबेच्या वनांत, नाच रे मोरा नाच!”
“इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.”
“माणसाच्या मनाचे लहानमोठेपण, रागद्वेष घटकेत घालवून टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.”
“हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात, त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.”

विष्णु सखाराम खांडेकर

“मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते.”
“जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.”
“माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते.”
“आयुष्याचा प्रत्येक क्षण जो लढत राहतो तोच खरा मनुष्य.”
“समाजाला कटू सत्य नकोय, सत्याचा गोड आभास हवा आहे. निती नकोय, नीतीचं नुसत प्रदर्शन हवंय.”
“मरणे आणि मारणे या दोन गोष्टी फार सोप्या आहेत. जगणे आणि जगवणे त्यामाने फार कठीण.”
“सहानुभूतीला नुसता जीभेचा ओलावा पुरत नाही, तिथं हृदयाचा ओलावाही असावा लागतो.”
“सत्ता शिक्षा करू शकते, पण सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असतं.”
“खरा आनंद तर दुसऱ्याच्या सुखात सुख मानल्याने आहे, स्वतःच्या सुखासाठी तर सगळेच आनंदी असतात.”
“आयुष्यात मोहाचे क्षण वारंवार येतात पण या क्षणांवर जे विजय मिळवतात तेच आपल्या आयुष्यावर सत्ता चालवू शकतात.”

शिवाजी गोविंदराव सावंत

“सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यासारखं…!”
“जीवनात असेही काही-काही क्षण असतात की, त्या क्षणी अपमान बाजूला ठेवून कर्तव्याची कास धरावीच लागते.”
“कोणतीही विद्या ही कधीच व्यर्थ जात नाही, योग्य वेळी ती उपयोगाला येतेच.”
“आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा मानव हा या जगातला एकमेव प्राणी असावा!”
“सर्वच कल्पना पराक्रमावर सफल होत नाहीत म्हणून आणि राजकारण हाही एक महान पराक्रमच आहे.”
“सत्य हे राजाचा मार्ग ठरवीत नसतं. राजा ठरवील तोच मार्ग सत्य म्हणून समाज स्वीकारीत असतो!”
“जीवन ही सूर्यापासून स्फुरलेली एक दिव्य प्रकाशलाट आहे! आणि हे ज्याला नि:संदेह पटलं आहे, त्याचं जीवन प्रकाशाशिवाय अन्य काय असणार?”
“माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसविता येणं कुणालाच शक्य नसतं.”
“कारण कुणीही कधीच विसरू नये की, काळ हा अखंड आहे. जीवन ही भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे!”

रणजित देसाई

“शिवाजी टिकतो, की नाही, हा प्रश्न नाही. राज्य टिकतं, की नाही, हा सवाल आहे. राज्य राखलंत, तर असे दहा शिवाजी येतील!”
“कर्तव्य हे कधीही सुखाच्या वाटेने जात नाही. त्यासाठी वैयक्तिक सुखाची आहुती द्यावीच लागते.”
“माणसाचे मोठेपण त्याच्या अधिकारावर ठरत नाही, तर तो तो अधिकार कसा वापरतो आणि संकटात कसा वागतो, यावर ठरते.”
“दैवाशी भांडता येते, पण माणसाने स्वतःच्या कर्तव्याशी आणि निष्ठेशी कधीही प्रतारणा करू नये.”
“दान देणे हा केवळ धर्म नाही, तर ती आत्म्याची भूक असते. जे हात देण्यास शिकतात, ते कधीही रिकामे राहत नाहीत.”
“ते सौंदर्य पाहिलं, पण फार कमी भासलं. मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई, सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते.”
“सागर केवढा अफाट! कदाचित तो खोल असेलही! पण त्या सागराला उंची कुठे आहे? ज्याची मान ताठ नाही, त्याने जगावं कशाला? त्या सपाट जिण्याला अर्थ तरी काय?”
“ऋणानुबंधाची दोन दुबळी वळी हाती दिली जातात. अहंकाराचे शीड उभारलेले असते. पण तेवढ्यावर थोडाच पैलतीर गाठला जातो? अनुकूल दैवाचे वारे लाभले तरच पैलतीर गाठता येतो.”

नारायण गोपाळ धारप

“माणसाला सगळ्याची सवय होते. भीतीचीसुद्धा सवय होते.”
“कुतूहल म्हणजे मानवाला मिळालेला मोठा वर आहे, शापही आहे.”
“माणूस स्वतःला अनेक घटनांचा कर्ता समजत असतो-पण निसर्गाच्या योजनेमध्ये माणसाला त्याला वाटतं एवढं महत्त्वाचं स्थान नाही”
“भीती ही बाहेर नसते, ती माणसाच्या मनात असते. एकदा का मनाने ती स्वीकारली की साध्या सावल्याही अक्राळविक्राळ वाटू लागतात.”
“स्वतःचा मोठेपणा स्वतःच सांगत डांगोरा पिटणाऱ्यांपैकी आचार्य खास नव्हते.”
“व्यवहारात माणसाने सावध राहिलं पाहिजे. माणसांची पारख करता यायला पाहिजे… हे ज्ञान उपजत नसतं; पण अनुभवांनी शिकून घ्यावं लागतं.”
“उपेक्षा ही जगातली सर्वांत क्रूर गोष्ट आहे.”

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी

“आयुष्यात कधी चिखलातून जावं लागलं, तर घट्ट मन आणि कोरड्या डोळ्यांनी जावं. मात्र जाताना आपला चिखल इतरांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी.”
“माणसाला आपले आयुष्य क्षणभंगूर असण्याची तेवढी भीती वाटत नाही, जितकी भीती ते निरर्थक असण्याची वाटते.”
“जी आठवण एखाद्या वस्तूवर अवलंबून असेल, ती न राहिलेलीच बरी.”
“माणूस स्वतःचे नशीब स्वतः घडवतो असे म्हणतात, पण खरं तर नशीबच माणसाला खेळवत असते आणि माणूस फक्त हातपाय हलवत असतो.”
“काही माणसे आयुष्यात अशी येतात की, ती जवळ असताना त्याचे महत्त्व कळत नाही, पण ती दूर गेल्यावर जाणवणारी पोकळी कधीच भरून निघत नाही.”
“काळाच्या ओघात जखमा भरतात असे म्हणतात, पण काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरत नाहीत, फक्त आपल्याला त्यांच्यासोबत जगायची सवय होते.”
“माणसाला सत्याचा जितका शोध असतो, तितकाच त्याला भ्रमात राहण्यातही एक वेगळाच आनंद मिळत असतो.”
“गर्दीत असण्याने माणसाचे एकटेपण संपत नाही. माणसाचे खरे एकटेपण हे त्याच्या विचारांमध्ये असते.”

चंद्रकांत काकोडकर

“प्रत्येक माणसाची कहाणी दिसते त्यापेक्षा कितीतरी खोल असते. कोणाच्याही आयुष्याचा न्याय वरवर पाहून करता येत नाही.”
“विचारांमध्ये स्वातंत्र्य, कृतीमध्ये प्रामाणिकपणा आणि मनामध्ये देशप्रेम नेहमी जिवंत ठेवले पाहिजे.”
“तरुणाईला योग्य दिशा मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये कर्तृत्वाची आणि संवेदनशीलतेची भावना असणे गरजेचे आहे.”
“माणूस जेव्हा परिस्थितीशी दोन हात करतो, तेव्हाच त्याच्या खऱ्या अस्तित्वाची आणि ताकदीची ओळख होते.”
“कला आणि साहित्य हे समाजाचा आरसा असतात, ते मानवी वयाच्या आणि मनाच्या गरजा पूर्ण करतात.”
“कुटुंब एकत्र ठेवणं ही एक साधना आहे. जेव्हा स्वार्थ मोठा होतो, तेव्हा नात्यांचे धागे कमकुवत होऊ लागतात.”
“पैसा माणसाला श्रीमंत करू शकतो, पण मनाची श्रीमंती आणि नात्यांमधील ओलावा विकत घेऊ शकत नाही.”
“भावा-भावांमधील प्रेम हे केवळ रक्ताच्या नात्यावर नाही, तर एकमेकांबद्दल असणाऱ्या आदरावर टिकून असतं.”
“आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय न घेता आल्यास, माणसाला आयुष्यभर फक्त आणि फक्त परिस्थितीसमोर झुकून दुःख सहन करावं लागतं.”
“स्वतःचे निर्णय स्वतः खंबीरपणे घ्यायला शिका. दुसऱ्यांच्या हातातील बाहुले बनून जगण्यात कसलाही आनंद नाही.”
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाची जिद्द आणि कर्तबगारी त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देते.”
“कविता लिहिणं म्हणजे फक्त शब्द जुळवणं नसतं… ती मनाला स्पर्श करून गेलेल्या एखाद्या नजरेतून किंवा आठवणीतून सुरू झालेला एक भावनिक संघर्ष असतो.”
“कलाकार हा समाजाचा संवेनशील भाग असतो. तो जे जगतो आणि पाहतो, तेच त्याच्या कलेतून बाहेर पडत असतं.”
“संगीताची धून आणि साहित्यातील शब्द हे मानवी मनाला शांत करण्याचं आणि त्यात नवी ऊर्जा भरण्याचं सर्वात मोठं साधन आहेत.”
“सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं. संस्कृती ही माणसाच्या वागण्यातून आणि विचारांतून स्पष्ट होते.”
“माणसाच्या आयुष्यात सुखाचे क्षण जितके सुखावून जातात, तितकेच दुःखाचे प्रसंग त्याला आतून परिपक्व आणि मजबूत बनवतात.”
“निष्ठा ही केवळ नात्यापुरती मर्यादित नसते, ती आपल्या कामावर, देशावर आणि स्वतःच्या विचारांवरही असावी लागते.”

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

“माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस नसावा.”
“हसा इतके की आनंद कमी पडेल, आणि रडा असे की अश्रू थकेल.”
“रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.”
“विनाकारण लोकांना त्रास देणारा एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य.”
“जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!”
“चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही जर एखाद्याचं मन चोरलं, तर त्यात वाईट काय आहे?”
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण जगणं कशासाठी, याचं उत्तर गवसेल असा एखादा कलासक्त छंद जोपासा.”
“कुणीसं म्हटलयं – कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी तसा मी असा मी असामी!… खर सांगू का? हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे. जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय.”

वसंत पुरुषोत्तम काळे

“अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कोणाला तरी हवा असतो.”
“माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते.”
“खर्च झाल्याचं दुःख नसतं, दुःख असतं ते हिशोब न लागल्याचं.”
“रडणाऱ्याला कुणीतरी हसवावं, हसवणाऱ्याशी कुणीतरी खेळावं आणि खेळवणाऱ्याला शेवटी कुणीतरी आपल्या मिठीत घ्यावं.”
“वाईट काळात कसला आलाय अनुभव? वाईट काळ म्हणजे माणसं ओळखण्याची सोय!”
“ज्याचं मन सुंदर असतं, त्याला सगळं जग सुंदर दिसतं.”
“आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हे. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं.”
“तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरू. कारण प्रचीतीचं झगझगीत तेजोवलय पाठीशी उभं असतं.”
“प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो त्याचं प्रस्थान मनातच हवं.”
“माणूस ओळखणं कठीण नाही, फक्त आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं बंद केलं पाहिजे.”
“दोन व्यक्तींमधील अंतर कमी करायचं असेल, तर संवाद हवा… आणि संवाद हवा असेल, तर समजूतदारपणा हवा.”
“माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे, जगाचं काय… जग तर देवामध्ये पण चुका शोधतं!”
“मित्र असे पाहिजेत जे तुमच्या डोळ्यांतील अश्रू पाहून, तुमच्या रडण्याचे कारण ओळखू शकतील.”
“प्रेम म्हणजे केवळ एकमेकांकडे पाहत राहणे नव्हे, तर दोघांनीही एकाच दिशेने एकत्र पाहत जगणे.”
“कालचा दिवस निघून गेला, त्याचा विचार करू नका. उद्याचा दिवस अजून आला नाही, त्याची काळजी करू नका. आजचा दिवस तुमचा आहे, तो भरभरून जगा.”
“सुखात सगळेच सोबत असतात, पण जे दुःखात पाठीशी उभे राहतात, तीच आपली माणसे असतात.”
“आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतंं ते साध्य करून दाखवणं.”
“आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहात नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच आपण सुखी होतो.”

काशीबाई कानिटकर

“स्त्रीने शिकणे म्हणजे केवळ अक्षरे ओळखणे नव्हे, तर स्वतःच्या हक्कांची आणि अस्तित्वाची जाणीव करून घेणे होय.”
“जोपर्यंत घरातील स्त्री सुशिक्षित आणि विचारी होत नाही, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती अशक्य आहे.”
“परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर अज्ञानाचा उंबरठा ओलांडता येतो.”
“स्त्रीने केवळ कुटुंबासाठी स्वतःला संपवून न घेता, स्वतःचे साहित्यिक आणि वैचारिक अस्तित्वही जपले पाहिजे.”