WeLekhak || आम्हीलेखक

2021 July 17

अभिप्राय पुस्तक : खडकावरील हिरवळ लेखक : श्री. ना. पेंडसे

पुस्तक : खडकावरील हिरवळ

लेखक : श्री. ना. पेंडसे 


श्रीनांच्या लेखणीतून उगवलेली 'खडकवरील हिरवळ'

तुंबाडचे खोत आणि लव्हाळी या नंतर श्रीनांचं हे तसं दुर्लक्षित किंवा स्मृतीबाहेर गेलेलं पुस्तक आज वाचलं.

श्रीनांच्या दुर्गेश्वर या कोकणातील गावाच्या परिसरातल्या निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. अतिशय छोटेखानी हे पुस्तक तासादोन तासात वाचून होतं. 

प्रत्येक व्यक्तीचं चित्रण कथा स्वरूपात नेहमीच्या ओघवत्या आणि सोप्या भाषेत लिहिलं आहे. प्रत्येक कथा 4 5 पानांत संपवली आहे. आयुष्यात खूप दुःख भोगलेल्या पण आता ते सगळं मागे सारून आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या या गोष्टी आहेत. आपलं आयुष्य चांगलेपणाने जगत राहायचं, दुःख कितीही असली तरीही आपलं कर्तव्य सोडायचं नाही हा संदेश सर्वसाधारणपणे या व्यक्तिचित्रांतून दिसतो.

श्रीनांच्या आधीच्या पुस्तकांमुळे याकडून खूप अपेक्षा ठेवणे साहजिक होते पण तितकी ती पूर्ण होत नाही. पण तरीही व्यक्तीचित्रणाच्या शैलीसाठी आणि श्रीनांसाठी जरूर वाचावे असे 'खडकवरील हिरवळ'.

Credit : instagram@maze_pustak


  1. 1
  2. 2