WeLekhak || आम्हीलेखक

2021 July 16

अभिप्राय : पुस्तक - हिजडे, लेखिका - स्वाती चांदोरकर

स्वाती चांदोरकर या लेखिकेने त्रितियपंथी लोकांची व्यथा आपल्यासमोर या पुस्तकातून मांडली आहे....फार पूर्वी शेहनशाह, त्रितियपंथी लोकांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे जनानखाण्यात सुरक्षारक्षक म्हणून ठेवत असत... पण पुढे त्यांचा प्रामाणिकपणा इंग्रजांसाठी धोकादायक ठरू शकतो या हेतूने त्यांना विनाकारण बंदी बनवण्यात आले आणि त्यांचा अतोनात छळ करण्यात आला पण एक दिवस एका जेलरला या सगळ्यात प्रकरणात या लोकांची काहीही चुक नाही हे लक्षात येते अन दया दाखवून त्यांना तो एक दिवस मुक्त जगण्यासाठी सोडतो आणि म्हणतो "वन डे इज ऑन्ली हिज डे"आणि त्यांना त्यादिवशी पासून यांना "हिजडे" म्हंटले गेले हा शब्द त्यांच्यासाठी मुक्तीचा दिवस म्हणून मानाचा आहे असें ते मानतात..कथेची सुरवात होते ती हेलीना नावाच्या वीसवर्षीय लाजऱ्याबुजऱ्या अन शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे खचलेल्या, जगापासून अलिप्त राहणाऱ्या मुलीपासून..मानसोपचार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत असताना तिची मैत्री होते ती चमेली सोबत जी एका त्रितियपंथी "हाला "ची मुलगी असते तिला लोकांनी जवळपास वाळीत टाकल्यासारखेच असते.. दुसरी मैत्रिण जया तिला मुलींबद्दलचं आकर्षण का वाटतं असते याची नुकतीच जाणीव झालेली.. चमेली अन जया सोबत मैत्री झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णतः बदलून जाते.. चमेलीसोबत राहून ती त्रितियपंथी लोकांना साधे पोट भरण्यासाठी किती कठीण आयुष्य जगावे लागते याचे प्रचिती येते.. या वस्तीतील, शामची श्यामली होताना, आणि "सुक्की"ची "तो" होताना जी शरीराची, मनाची वेदनादायी चिरफाड होते ते वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.. शरीर अन मन दोन्ही भिन्न असणारी ही लोक निसर्गाची ही दुष्ट्ट देणगी नाकारतात तेंव्हा प्रामाणिकपणे देवाची माफीही मागतात.. प्रामाणिकपणा यांच्यात जन्मतः असतो.. पैशासाठीची खरं तर जगण्यासाठीची धडपड, त्यामुळे करावी लागणारी देहविक्री आणि अस्वछता त्यातून होणारे जीव घेणारे भयंकर आजार, स्वतःच्या लोकांनी नाकारलेले, समाजाने नाकारलेले अश्यामधे हे लोक एकमेकांचा आधार बनतात.. अतिशय हृदयद्रावक व्यथा या पुस्तकातून समोर आणणाऱ्या धाडसी लेखिकेला सलाम, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा तपशील अगदी बेडरपणे पुस्तकात मांडला आहे.. हेलीना, चमेली, जयाचा आणि त्रितियपंथी लोकांचा जीवन प्रवास यातून कसा होतोे जाणून घेण्यासाठी नक्की हे पुस्तकं नक्की वाचा...


©अभिप्राय - Manisha Sandip 

Instagram@maze_pustak


  1. 1
  2. 2