BramhadevKhillare

2021 July 05

मुलगी

मुलगी


जराशी लडिवाळ जराशी नाजूक

लटकेच कधी रुसून बसते मुलगी

घराला घरपण सहजच येते

जेव्हा घरी जन्माला येते मुलगी


जराशी हट्टी, जराशी हळवी

लाजाळूचे वेल असते मुलगी

फुलांनाही दरवळ सुटतो

जेव्हा परसात जाते मुलगी


मखमली स्वप्न झुल्यावरूनी

हलकेच हिंदोळे घेते मुलगी

तिला शिकवा,तिला घडवा,मग

अवकाशातही जाऊन येते मुलगी


आईवडीलासाठी नेहमीच

किती काळीज जाळते मुलगी

तिला सासराला धाडताना

किती अश्रू ढाळते मुलगी


#गोड_गोजिरी_पुतणी_ऋतुजा


©®

डॉ.ब्रम्हदेव खिल्लारे

8766825323

  1. 1
  2. 2